मुंबई: राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून हाती घेतला आहे. मशिदींवरील भोंग्यांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. या संदर्भात त्यांनी राज्यभर आंदोलनाचा इशाराही दिला होता. यामुळे राज ठाकरे हे भाजपला अनुकूल अशी भूमिका घेत आहेत, भाजपचा अजेंडा राबवत आहेत अशी विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे यांना एक महत्वाच्या सल्ला दिला आहे, ते आज मुंबईत पसारमाध्यमांशी बोलत होते.
रोहित पवार म्हणाले, “राज ठाकरे हे स्वत: एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे राज्यात कुठेही जाऊन ते त्यांचा पक्ष वाढवू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे. पण दुसऱ्या पक्षाचं ऐकून राज ठाकरे भाषण करत असतील तर त्यांनी स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवून देऊ नये. त्यांची ओरिजिनॅलिटी कुठेतरी हरवत चालली आहे. ती त्यांनी जपली पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते”.
यावेळी रोहित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला पाठींबा दिला आहे. रोहित पवार म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील सभेत राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्यांच्या डोक्यात केमिकल लोच्या झाल्याचे उद्धव यांनी म्हटले होते. उद्धवजी हे राज ठाकरे यांचे बंधू आहेत. आमच्यापेक्षा ते त्यांच्या जास्त जवळ राहिले आहेत. त्यांच्याबद्दल त्यांना जास्त गोष्टी माहिती असाव्यात. त्यामुळेच त्यांनी असे वक्तव्य केले असावे”.
महत्वाची बातमी –