नवी दिल्ली: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विद्यापाठात कुलगुरूंची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, “आम्ही संघर्ष करत नाही. त्यांना खाजवायची सवय पडलीये. त्यांची खाज कधी संपेल माहीत नाही. पण एवढीपण खाज बरी नाही.” असा टोला संजय राऊत यांनी लगावला. आज ते माध्यमांशी संवाद साधत होते.
दरम्यान नवी दिल्लीत राज्यातील सर्व पक्षीय खासदार, आमदार संसदीय कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी गेले आहेत. यावर शिक्षणासाठी किंवा काही गोष्टी शिकण्यासाठी खासदार आणि आमदार दिल्लीत येतात. राज्यातील सर्व पक्षांचे हे खासदार आहेत. आमचं कर्तव्य आहे त्यांच्याशी बोलावं. संवाद साधावा. पक्ष वगैरे महाराष्ट्रात. दिल्लीत आम्ही सर्व एकत्र आहोत. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच आज रात्री त्यांच्यासाठी शरद पवारांकडे भोजन व्यवस्था आहे. डिनर डिप्लोमसी नाही. जेवण आहे. आम्ही यजमान आहोत त्या सर्वांचे. असं वातावरण खेळीमेळीचं महाराष्ट्राच्या राजकारणात होतं आणि ते राहावं असं आम्हाला वाटतं. तसेच अखंड महाराष्ट्रातील जे जे खासदार दिल्लीत उपस्थित आहेत. त्यांना बोलावलं आहे. यात राजकीय पक्ष पाहण्याची आवड कुणाला असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. असेही राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022 LSG vs SRH : हैदराबादचा भुवनेश्ववर कुमार बनला सुपरमॅन, पण….; पाहा नेमके काय घडले!
“शरद पवार जरी मित्र असले, तरी ती नि** प्रवृत्ती आहे”, शिवसेनेची जुनी फेसबुक पोस्ट व्हायरल
ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात लता मंगेशकर यांना श्रद्धांजली न वाहिल्याने कंगनाचा संताप
“तुम्ही चिकन खरेदी केलंत तरी भाजप ईडीला कळवेल”, संजय राऊतांचा प्रहार
“टीम इंडियाचे युवा खेळाडू कुंबळेला खूप घाबरायचे…”, विराट कोहलीचा गौप्यस्फोट!