‘महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका’: चित्रा वाघ

मुंबई :  भाजपच्या नेत्या चित्रा वाघ सध्या विविध कारणामुळे चर्चेत आहेत. माध्यमाद्वारे तसेच सोशल मिडियाद्वारे त्या आपले मत परखडपणे मांडत असतात. नुकतेच एक ट्वीट करत चित्रा वाघ यांनी महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष पद नसल्याबाबत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करत नाव न घेता रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, ‘महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल’. चित्रा वाघ यांनी मार्मिक पद्धतीने विरोधकांवर टीका केली आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून महिला आयोगाची जागा रिक्त आहे त्यासंदर्भात अजून कुठलाच निर्णय घेतला जात नसल्यामुळे चित्रा वाघ यांनी कुठे तरी महाविकास आघाडीला लक्ष केल्याचे दिसते. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकरांची निवड करण्याच्या हालचाली सुरु आहे त्यावरून वाघ यांनी माविआ सरकारला सल्ला दिल्याचे समजले जाते आहे.

महत्त्वाच्या बातम्या