‘खोटी स्तुती करू नका, स्पर्धक बिघडतील’; सोनूचा ‘इंडियन आयडल’ शोला सल्ला

सोनू निगम

मुंबई : रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ अनेकदा वादात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी या सेटवर किशोर कुमार यांचा मुलगा आणि गायक अमित कुमार आले होते. त्यानंतर त्यांनी जो खुलासा केला त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच यातील स्पर्धकांमुळे ही चर्चा होत असते. आता पुन्हा एकदा या शोची चर्चा सुरू झाली आहे. प्रसिद्ध गायक सोनू निगम याने या शोवर निशाणा साधत इतकी देखील स्तुती करू नका की ते बिघडतील असा सल्ला शोच्या मेकर्सला दिला आहे.

सोनू निगमने एका मुलाखतीत म्हणाला की, ‘आपल्याकडे परीक्षक हे स्पर्धकांना काही तरी शिकवण्यासाठी असतात. परीक्षकांनी स्पर्धकांना प्रामाणिकपणे त्यांचे मत सांगणे अपेक्षित असते. सतत स्पर्धकांचे कौतुक करण्यात काहीच अर्थ नसतो. परीक्षकांनी सतत स्पर्धकांचे वा वा म्हणत कौतुक करून कसे चालेल? असे करणे म्हणजे मुलांना बिघडवण्यासारखेच नाही का? परीक्षकांना मुलांना बिघडवायचे नाही तर घडवायचे आहे. परीक्षक सतत स्पर्धकांचे कौतुक करत राहिले तर स्पर्धकांना ते कधी चुकले ते कधी कळणारच नाही.’ असे सोनुने सांगितले आहे.

याआधी या शोमधील पवनदीप व अरूणिताचा लव्ह अँगल खोटा असल्याचे समोर आले होते. तसेच या शो मधील दोन स्पर्धकांना बाहेर काढण्याची देखील मागणी करण्यात आली होती. या शोचे असे एक ना अनेक या किस्से समोर येत असल्याने हा शो टीआरपीसाठी पुढे काय काय करतील सांगता येत नाही असे देखील बोलले जात आहे. यामुळे या श बाबत अनेक लोक संताप व्यक्त करताना दिसतात.

महत्त्वाच्या बातम्या

IMP