‘जिल्हा परिषदेतील शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करू नका’

‘जिल्हा परिषदेतील शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करू नका’

zp

औरंगाबाद : जिल्हा परिषद शाळांमधील कार्यरत शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. परंतु ग्रामीण भागात मूलभूत सुविधांची अडचण येत असल्यामुळे मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यात येऊ असे निवेदन शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाने नुकतेच जि.प. अध्यक्ष मीना शेळके, शिक्षण सभापती अविनाश पागलांडे व मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांना दिले.

कोरोना काळात गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. परंतु मिशन बिगेन अंतर्गत शासनाने हळूहळू सर्व प्रतिष्ठाण सुरू करीत असतांना वर्ग ५ ते १२ वर्ग सुरू करण्यास ४ ऑक्टोबर पासून मंजुरी दिली. व त्याच बरोबर जिल्हा परिषद शिक्षकांनी मुख्यालयी राहावे या विषयाला सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारत चालला असून पटसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा अर्थ जिल्हा परिषद शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण सुरू असल्याचे सिद्ध होते.

पूर्वीच्या काळाप्रमाणे आजही शिक्षकांनी नोकरीच्या गावात राहावे अशी मागणी काही मंडळीकडून होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ५० टक्के महिला शिक्षक कार्यरत असून मुलभूत सुविधा उपलब्ध नसताना वाडी-वस्तीवर राहण्याची सक्ती करणे चुकीचे आहे. शिक्षक सेनेने जिल्हा परिषद स्तरावरील पदाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन शिक्षकांना ग्रामीण भागात निवासस्थाने उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून तोपर्यंत मुख्यालयी राहण्याची सवलत देण्याची मागणी केली आहे. शिष्टमंडळात जिल्हा परिषद निमंत्रित सदस्य प्रभाकर पवार, जिल्हाध्यक्ष दीपक पवार, कार्याध्यक्ष भगवान हिवाळे आदींनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या