आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही

नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा – छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे . त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या खानदानाबद्दल जर कोणी अपशब्द काढले तर त्याची जीभ जागेवर राहणार नाही असा इशारा भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी काल पुण्याच्या एका कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा असं विधान केलं होतं. त्यावरून राज्यात राजकारण तापलं असून नारायण राणे यांनी यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांचा निषेध केला आहे.

Loading...

तसेच वंशज असल्याचा पुरावा मागणारे राऊत कोण आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांना तशी जबाबदारी दिली आहे का असा खोचक सवालही राणे यांनी या यावेळी उपस्थित केला.

तसेच संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे म्हणून ते असे वक्तव्य करत असल्याची टिप्पणी राणे यांनी केली. राऊतांच्या भावाला मंत्रिपद न मिळाल्याने ते अशी वक्तव्य करत आहेत असही राणे या वेळी म्हणाले.

त्याचवेळी कॉंग्रेसला सत्ता पाहिजे आणि सत्तेतून पैसा कमवायचा आहे म्हणून संजय राऊत काहीही बोलले तरी सत्तेसाठी कॉंग्रेस गप्प बसून राहणार अशी टीका, पूर्वी कॉंग्रेसमध्ये असलेले आणि आता भाजपचे खासदार नारायण राणे यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसवर केली आहे.

दरम्यान कॉंग्रेसच्या आक्रमक पावित्र्यानंतर संजय राऊत यांनी कालचे वक्तव्य मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. यावरही राणे म्हणाले कॉंग्रेसला फक्त स्वताची खाती महत्वाची आहे. त्यांना वाटत वक्तव्य मागे घेतल्याने सगळ संपलं. कॉंग्रेसला फक्त पैसा कमवायचा कारखाना चालू ठेवायचा आहे अशीही टीका राणे यांनी केली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार