कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खालच्या पातळीचे राजकारण करू नका…

सांगली : व्होक लिबरल या ट्विटर हँडलवरून वारंवार मंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात पोस्ट केल्या जात होत्या. आता स्वतः पाटील यांनी पुढे येत माझ्याविरोधात चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. माझ्या विरोधातील काही स्थानिक राजकारण्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. त्याचा मी निषेध करतो असे म्हटले आहे.

जयंत पाटील म्हणाले,इस्लापूरातील कोरोनाबाधित ‘ते’ कुटुंबीय इस्लामपूरात कधी दाखल झालं याची मला माहितीही नाही. त्यांच्या टेस्ट ज्यावेळी पॉझिटीव्ह निघाल्या तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी मला कळवले की इस्लामपूरात ४ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. मात्र व्होक लिबरल या ट्विटर हँडलवरून चुकीची माहिती पसरवली जात आहे.

संबंधित कुटुंबियांसाठी मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला नाही. कोरोनाबाधित सर्व रुग्णांवर मिरजेत उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वॉरनटाईन केले गेले आहे. प्रशासनाला कडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. कुणालाही कोणतीही मूभा दिली गेलेली नाही असं पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही सुरुवातीपासूनच लॉकडाऊनच्या समर्थनार्थ आहोत. राज्यात सर्वात आधी प्राथमिक शाळा व अंगणवाड्या सांगली जिल्ह्यात बंद केल्या गेल्या. आजही आम्ही काळजी घेत आहोत. खालच्या पातळीचे राजकारण करू नये. समाजात चुकीची माहिती पसरवून संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरोधात मी तक्रार दाखल करणार आहे.