छत्रपतींना नुकसान भरपाई नको पण सामान्य शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये द्या – संभाजीराजे

sambhaji raje

तुळजापूर : परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना धीर देणे अपेक्षित होते मात्र घरात बसून मुख्यमंत्री कारभार हाकत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढू लागली आहे.

भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती हे पंढरपूरच्या दौऱ्यावर असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. सद्या शेतकऱ्यांवर चहू बाजूनी संकटे ओढवली आहेत. कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडले आहे, बोगस बियाणं, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीड, खतांचा तुटवडा असा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला दोन दिवसांपपूर्वी झालेल्या पावसामुळे हाती आलेलं सोन्यासारखं पिक देखील गमवावं लागलं आहे. दरम्यान, संभाजीराजेंनी शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीला लोकप्रतिनिधींना जबाबदार धरलं आहे.

शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळत नाही उलट त्यांचं शोषण केलं जात, त्यामुळे टोकाचा निर्णय घेत ते आपला जीव देतात. त्यांच्या या मरणाला लोकप्रतिनिधीच जबाबदार आहे, असं म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासोबतच, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

तर, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची येत्या ३ दिवसात भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, ‘फक्त दौरे करू नका, शेतकऱ्यांना मदत करा’ असा अप्रत्यक्ष टोला देखील त्यांनी शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे. शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांबद्दल तक्रारी केल्या असून केंद्राकडून पाठपुरावा करण्याच आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे.

तर, छत्रपती घराण्याची शेती तुळजापूरात आहे. या शेतीच सुध्दा नुकसान मोठ्याप्रमाणात झालं आहे. आम्हाला नुकसान भरपाई नको. पण मराठवाड्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50000 रुपये सरकार ने तात्काळ जाहीर करावी. अशी मागणी देखील खासदार संभाजीराजे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-