मला महाराज म्हणू नका, महाराज एकच, शिवाजी महाराज : उदयनराजे

Udayraje Bhosale

सातारा : महाराज एकच फक्त छत्रपती शिवाजी महाराज. मला महाराज म्हणू नका, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशीर्वादामुळे जगत असल्याचं उदयनराजे म्हणाले.साताऱ्यात छत्रपती शिवाजीराजे भोसले संग्रहालयाच्या सुरु असलेल्या बांधकामाची पहाणी करताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

काय म्हणाले उदयनराजे ?

सातारा मराठा साम्राज्याची राजधानी असून, या ऐतिहासिक संग्रहालयाला पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आणखी दहा कोटींचा निधीही मी मंजूर करुन घेईन. श्रेयवादात मी पडणार नाही.त्याचसोबत,देशाला फक्त शिवाजी महाराजांचेच विचार तारतील. शिवाजी महाराजांनी इतक्या कमी कालावधीत साडे तिनशेहून अधिक गडकिल्ले बांधले, ही अशक्य गोष्ट महाराजांनी शक्य केली. त्यामुळे या किल्ल्यांचे जतन केले पाहिजे.”, अशा भावनाही उदयनराजेंनी व्यक्त केल्या.