आनंद हवा, उन्माद नको; नरेंद्र मोदींनी खासदारांना झापले

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० सरकारने काढून टाकले आहे. तसेच या भागात शांतता व स्थैर्य निर्माण व्हावे म्हणून काश्मीर आणि लडाख हा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे.

या आनंदाच्या भरात भाजपा समर्थकांमध्ये अतिउत्साहाचे वातावरण दिसत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सहकाऱ्यांना झापले. त्यांनी ‘अतिउत्साहाची सध्या गरज नसून, आता खरी कसोटी सुरू होणार आहे आणि त्या दिशेने भरपूर काम करायचे आहे’, अशा शब्दांमध्ये मोदींनी आपल्या सहकार्यांना सल्ला दिला आहे.

कलम ३७० आणि ३५ए ही कलमे रद्द करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी हा सल्ला दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी बोलताना ‘देशासाठी हा अत्यंत मोठा दिवस आहे. आपण सगळ्यांनी दूरदृष्टी व सर्वांना एकत्र घेण्याचा परिपक्वपणा दाखवायला हवा’, अस मोदी म्हणाले आहेत.

तसेच अशा निर्णयाचे काय परिणाम होऊ शकतात आणि समाजातील काही घटकांवर याचा काय परिणाम होऊ शकतो याची जाणीव सत्तेत असलेल्यांनी ठेवायला हवी असंही मोदींनी खासदारांना सांगितल्याचे वृत्त आहे.

पवारांच्यापुढे मोठ्या आवाजात राडा घालणाऱ्या ‘या’ युवा नेत्याने केला सेनेत प्रवेश

 

भाजप कार्यकर्त्यांनो जरा तरी लाजा : राज्य संकटात असताना भाजप कार्यकर्त्यांचा नंगा नाच

 

पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करा, प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना आवाहन