मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी राज्यात ४३ हजार १८३ कोरोनाबाधित आढळले आहेत, तर २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत राज्यात ३ लाख ६६ हजार ५३३ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता जनतेशी सवांद साधत आहेत. मुख्यमंत्री आज लॉकडाऊन करणार का ? असा प्रश्न आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला होता. यामुळेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्या संबोधनाच्या सुरुवातीलाच घाबरू नका, मी तुम्हाला घाबरवायला नाही आलो नाही असे उद्गार काढले आहेत.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेवर आता कोणते निर्बंध लागू करणार आहेत हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरले आहे.
दरम्यान उद्यापासून पुण्यामध्ये पुढील सात दिवसांसाठी हॉटेल, बार, मॉल, सिनेमागृह पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तर हॉटेलमधून होम डिलेव्हरी सुरु राहणार आहे. तर पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पीएमपीएमएल पुढील सात दिवसांसाठी बंद असणार आहे. दरम्यान, सर्व धार्मिक स्थळे देखील पुढील सात दिवसांसाठी बंद असणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे सायंकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत अत्यावशक सेवा वगळता पूर्णपणे संचारबंदी असणार आहे. तर ९ एप्रिलला पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राव यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- …म्हणूनच मी धीर धरण्याचे आवाहन केले होते; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद सुरु
- पुण्यात उद्यापासून मिनी लॉकडाऊन, दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी…
- ‘ “आधारवड” पवारांचा हॉस्पिटलमध्ये मुक्काम, तरीही त्यांची देशासह राज्यातील घडामोडींवर बारीक नजर’
- ‘प्रिय EC, माजरा क्या है ?’ भाजप नेत्याच्या गाडीत ईव्हीएम सापडल्यानंतर प्रियांका गांधींचा सवाल
- Breaking : पुण्यात लॉकडाऊन नाहीच, मात्र ‘हे’ असणार कडक निर्बंध