‘वय विचारू नका थोडी लाज वाटते…’ ; वाढदिवसानिमित्त राजेश्वरीची मजेशीर पोस्ट

राजेश्वरी

मुंबई : मराठी चित्रपटातील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळें यांचा गाजलेल्या ‘फँड्री’ या चित्रपटातील सोज्वळ चेह-याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोला चाहत्यांची बरीच पसंती देखील मिळते. नुकतंच राजेश्वरीने तिच्या वाढदिवसानिमित्ताने इंस्टग्रामवर एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये राजेश्वरीने बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत. शाळेतील मुलगी ते आज या मनोरजंन क्षेत्राचा एक भाग तिथपर्यंतचा सगळा प्रवास राजेश्वरीने या पोस्टमध्ये लिहिला आहे. पोस्टच्या सुरुवातीला शालूने मजेशीर गोष्ट लिहिली आहे. पाहूया राजेश्वरीची पूर्ण पोस्ट…

‘वय विचारू नका थोडी लाज वाटते परंतु अनुभवाबद्दल सांगायच झाल तर बर्‍याच प्रमाणात वाईट ही होता आणि खूप सार्‍या प्रमाणात चांगला ही होता. अनेक लोक भेटली कोणी आपले झाले कोणी काम झाल्यावर बाजूला झाले व कोणी अजूनही सोबत उभे आहेत. वेळ चांगली असो वाईट असो आपण सर्व माझ्यासोबत होता आणि आपण दिलेल्या प्रेमामुळे आज राजेश्वरी येथे पोहोचली आहे.

वैयक्तिक आयुष्यात राजेश्वरी कोण आहे कशी आहे याची कल्पना फार कमी लोकांना आहे. कधी नजर वर करून न चालणारी, आपल्या कामाशी काम ठेवणारी, कोणी काही बोललं तर ढसा ढसा रडणारी चष्मा लावून दोन वेण्या बांधुन सायकलवर शाळेला जाणारी खूप साधारण मुलगी होती राजेश्वरी.

आयुष्यात एक मोठा बदल लिहलेला होता तो घडून आला आणि ती मराठी चित्रपटसृष्टी मध्ये झळकली. अभिनयाचा काहीच वारसा नसलेल्या त्या मुलीला सुरुवातीला माहिती नव्हते हे नवीन जग काय असतं. कोणी सांगितलं तसं करून पाहिले कधी स्वतःच्या मानाने करून चुका ही घडल्या आणि असेच चुकत चुकत बराच अनुभव आला

लोकांची परख कशी करावी माहित नव्हते म्हणुन आयुष्यात अनेक ठिकाणी चुका घडल्या परंतु त्यातून जे काही शिकायला मिळाले ते पुढे फार उपयोगाचे ठरले. आज सरळ तोंडावर खरे बोलण्याच्या सवयीमुळे बर्‍याच कमी प्रमाणात लोकांना ती आवडते. अभिनेत्री म्हणाल्यावर कोणी कधी कोणती अफवा पसरवेल याचा नेम नाही परंतु हे सुद्धा सकारात्मकपणे सांभाळून आजसुद्धा राजेश्वरी आपल्या आयुष्यात खूप खुश आहे. इतर वेळी कधी बोलायला वेळ मिळत नाही, आज वाढदिवसानिमित्त थोडं बोलायला मिळाले.

असो, आपण सर्वांच्या प्रेमामुळे आज फार छान वाटल, काल रात्रीपासूनच फोन, मेसेज इतक्या प्रमाणात चालू झाले आहेत की काय सांगावे. परिस्थिती पाहता मी आज वाढदिवस साजरा करणार नाही, तरी माझ्या आग्रहाने आपन सर्वांनी थोडे थोडे तोंड गोड करून घ्या आणि जसे जमेल तसे आपली व आपल्या जवळच्यांची काळजी घ्या, मास्लाक वा विनाकारण बाहेर फिरू नका. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार आणि खूप खूप प्रेम.’ वाढदिवसानिमीत्ताने मिळाल्येला शुभेच्छांसाठी देखील तिने चाहत्यांना धन्यवाद म्हंटले आहे. राजेश्वरीच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :