Winter Health Care | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये (Winter) आरोग्याची (Health) अधिक काळजी (Care) घ्यावी लागते. कारण हिवाळ्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी लोक अनेक गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करतात. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याची समस्या उद्भवते. हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करत असतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही उपायांसह तुमच्या आहारामध्ये काही पदार्थांचे सेवन थांबवले पाहिजे. या पदार्थांचे सेवन टाळल्याने सर्दी खोकला लवकर बरा होण्यास मदत होऊ शकते. सर्दी खोकल्यामध्ये पुढील गोष्टींचे सेवन करू नका.
दही
ज्या लोकांना सर्दी खोकल्याचा त्रास आहे, त्यांनी दह्यापासून लांब राहिले पाहिजे. कारण दह्याचा प्रभाव हा थंड असतो. त्यामुळे सर्दी खोकला असताना त्याचे सेवन करणे टाळावे. तुम्ही जर रात्रीच्या वेळी दह्याचे सेवन करत असाल, तर तुमच्या शरीरामध्ये कफ वाढण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे दह्याचे रात्रीचे सेवन करणे टाळावे.
जंक फूड
जंक फूड आपल्या आरोग्यासाठी कधीही चांगले नसते. त्यामुळे शक्य होईल तितके जंक फूडचे सेवन करणे टाळले पाहिजे. प्रामुख्याने तुम्हाला जर सर्दी खोकला असेल, तर तुम्ही जंक फूडपासून लांबच राहिले पाहिजे. कारण यामध्ये तेल, मसाले जास्त प्रमाणात वापरले जातात. त्यामुळे याचे सेवन केल्याने आरोग्याला जास्त नुकसान होण्याची शक्यता असते.
आंबट पदार्थ
सर्दी आणि खोकल्याने ग्रस्त असलेल्यांनी आंबट पदार्थांचे सेवन करणे टाळावे. खरंतर आंबट पदार्थांमध्ये विटामिन सी उपलब्ध असते. विटामिन सी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे अनेक लोक आंबट पदार्थांचे जास्त सेवन करतात. पण तुम्हाला जर सर्दी खोकला असेल, तर आंबट पदार्थांच्या सेवनाने तुमच्या शरीराला विटामिन सी चा विशेष फायदा होणार नाही. त्यामुळे तुम्ही जर सर्दी खोकल्याने ग्रस्त असाल तर तुम्ही आंबट पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian Case | दिशा सालियान प्रकरणाची SIT मार्फत चौकशी होणार, देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती
- Winter Session 2022 | विदर्भातील शेतकऱ्याला न्याय मिळेल का? – अमोल मिटकरी
- IND vs BAN | सामन्यामध्ये उतरताच जयदेव उनाडकरने रचला ‘हा’ विक्रम
- Nitesh Rane | दिशा सालियान प्रकरणावरून नितेश राणेंकडून चौकशीची मागणी, सभागृहात मोठा गोंधळ!
- Hero Bike Launch | हिरो Xpulse 200T 4V लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये