गोष्ट भ्रष्टाचार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‘गाढवांच्या’ लग्नाची

बार्शी : आपण आजवर पाउस पडण्यासाठी. . काही गावांमध्ये गाढवाच लग्न लावण्यात आल्याच एकल असेल. . मध्यंतरी गाढवच लग्न हा मराठी चित्रपट देखील चांगला गाजला होता. हेच गाढवच लग्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये लावण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे गाढव आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या गाढवीनीच्या लग्नामुळे.

बार्शी कुर्डूवाडी राज्य महामार्गाची झालेली दुरावस्था आणि त्यावर होणारे अपघात यामुळे बार्शी तसेच कुर्डूवाडी शहरातील नागरीक हैराण झाले आहेत. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून डांबरी रस्ता जणू गायबच झाला आहे. याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या नेतृत्वात आज एक आगळवेगळ आंदोलन करण्यात आले आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे गाढव आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या गाढवीणीचे प्रतिकात्मक लग्न लावण्यात आले आहे.

बार्शी कुर्डूवाडी रस्ता हा मराठवाड्याच्या प्रवेशद्वाराचा मार्ग म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही वर्षापासून या रस्त्याची चाळण झाली असून ३४ किलोमीटरच्या मार्गात खड्डेच-खड्डे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत अनेक वेळा निवदने देवूनही काहीच कारवाई होताना दिसत नाही. आता खड्डेमुक्त रस्त्यासाठी बार्शीमध्ये नागरिकांनी मोठे जनआंदोलन पुकारले आहे. याचच एक भाग म्हणून भाऊसाहेब आंधळकर यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागाचे गाढव आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या गाढवीणीचे वाजत गाजत वरात काढत लग्न लावण्यात आले आहे.

यावेळी बोलताना शिवसेना नेते भाऊसाहेब म्हणाले कि. ‘ गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तुळजापूर तसेच मराठवाड्यात जाण्यासाठी हा मार्ग आहे. मात्र रस्त्यावरील खड्यामुळे नागरीक सोलापूर मार्गे तुळजापूरला जाणे पसंत करत आहेत. यामुळे एका बाजूला मोठी बाजारपेठ असलेल्या बार्शीला याचा फटका तर बसतोच आहे तसेच आता लोकही आमच्या शहराला नाव ठेवू लागली आहेत. वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवदने देवून काहीच कारवाई होत नाही. मात्र यापुढे देखील कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे’. यावेळी नागजी नान्नजकर. अमित रसाळ, दीपक आंधळकर यांच्यासह बार्शीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...