fbpx

पोलिसांचा ‘गाढव’पणा

donkey

टीम महाराष्ट्र देशा – कायद्यापुढे सगळे समान या वाक्याची तंतोतंत अंमलबजावणी करत उत्तर प्रदेश पोलिसांनी चक्क ७ गाढवांना अटक करून ४ दिवस जेलमध्ये डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेलबाहेर लावलेल्या झाडांची पाने या गाढवांनी खाल्ल्याने त्यांना अटक करण्यात आली होती . जालौन जिल्ह्यातील उरई इथली ही घटना आहे.

त्याचं झालं असं की, एका व्यक्तीनं आपली गाढवं चरायला मोकाट सोडली होती. ही गाढवं पोलीस ठाण्याच्या कुंपणात शिरली. येथे पोलीस ठाण्याच्या सुशोभीकरणासाठी काही झाडं लावली होती, या मुक्या प्राण्यांनी ती खाऊन टाकली.ज्या झाडांची या गाढवांनी पाने खाल्ली ती महागडी झाडे होती त्यामुळे या गाढवांना पकडण्यात आल्याचं वरिष्ठ पोलीस हवालदार आर.के मिश्रा यांनी म्हटलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या झाडांवर खूप खर्च करण्यात आला होता. पण, या व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे या परिसराचं मोठं नुकसान झालं. म्हणून पोलिसांनी दोन गाढवांना आणि दोन घोड्यांना ताब्यात घेतलं. चार दिवस तुरूंगात ठेवल्यानंतर अखेर त्यांची सुटका करण्यात आली.