हवी तेवढी माणसे मारा,निवडून येणार आम्हीच दुबारा…, डोंगरी दुर्घटनेवरून सचिन सावतांचा टोला

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईकरांना आज अजून एक धक्का बसला आहे. मुंबईच्या डोंगरी भागात कौसरबाग इमारत कोसळली आहे. दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या दुर्घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरवात झाली आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप सेनेला लक्ष करत टीका केली आहे. हवी तेवढी माणसे मारा,निवडून येणार आम्हीच दुबारा…, अशी कविता करत सावंतांनी सत्ताधाऱ्यांना खोचक टोला लगावला आहे.

Loading...

“हवी तेवढी माणसे मारा
जनता बोंबले, चढवे पारा
शिवसेना-भाजपचा एकच नारा
निवडून येणार आम्हीच दुबारा…”, असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे.

दिवसेंदिवस मुंबई ही धोकादायक होत आहे. त्यामुळे सामन्य नागरिक आपला जीव मुठीत घेऊन मुंबईत वावरत आहे. डोंगरीमध्ये झालेली दुर्घटना ही मुंबईकरांसाठी मोठा धक्का आहे. डोंगरीतील बाबा गल्लीत चार मजली इमारत होती. इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. यात ४० ते ५० जन अडकल्याची शक्यता आहे. तर आतापर्यंत 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटानास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरु आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'