उदगीर जिल्हा निर्मितीसाठी पत्रकार संघाचे जागरण गोंधळ आंदोलन संपन्न

उदगीर/ प्रतिनिधी : उदगीर जिल्हा त्वरित घोषित व्हावा व झोपेचं सोंग घेतलेल्या शासनास जाग यावी म्हणून उदगीर तालुका मराठी पत्रकार संघ (रजि) उदगीरच्या वतीने ‘उदगीर जिल्हा जाहीर करा’ या मागणीसाठी मंगळवार(दि १४) रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ घालुन आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकरांसह राजकीय कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील नामवंत व विविध संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाचे निवेदन उपजिल्हाधिकारी व तहशीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

उदगीर जिल्हा त्वरित घोषित करावा या मागणी साठी व शासनास जागे करण्यासाठी उदगीर तालुका मराठी पत्रकार संघ उदगीरच्या वतीने उदगीर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर, मंगळवार (दि १४) रोजी सकाळी ११ वाजता पासुन गोंधळ जागरण आंदोलन करण्यात आले आहे. सोमनाथपुर येथील प्रसिद्ध गोंधळी गंगाधर घोगरे, बलिराम घोगरे, श्रीपतराव घोगरे, कृष्णा घोगरे, ढोलकिपटु भरत मदने, शंकर तोड़करी, रामदास केंद्रे, कोंडीबा केंद्रे बोरगांव (ता. जलकोट) निलावती सावंत या कलाकारांनी गोंधळ व जागरणात सहभागी होते.

यावेळी श्रीनिवास सोनी, इरफान शेख, अशोक कांबळे, सुरेश पाटिल नेत्रगावकर, अर्जुन जाधव, सुनील हावा, संदीप निडवदे , माधव रोडगे, सिद्धार्थ सूर्यवंशी, आंबादास अलमखाने, राजू किनिकर, श्रीपाद सीमन्तकर, गंगाधर भेंड़ेगांवकर, नागनाथ रंगवाळ, विठल वलसने, व्ही. एस. कुलकर्णी, रामबिलास नावन्दर, विश्वनाथ गायकवाड़, अँड. श्रावनकुमार माने, अनंत पारसेवार, माधव डोंगरे, अनिल जाधव, नीलेश हिप्पळगावर, संजय वाघे, ज्ञानेश्वर राजुरे, प्रभुदास गायकवाड़, रविन्द्र हसरगुंडे, युवराज धोतरे, विलास कांबळे आदीं पत्रकारांसह सामाजिक कार्यकर्ते तसेच अनेक उदगीरकर बांधव उपस्थित होते.

तर उदगीर जिल्हा निर्मिती साठी भूमाता ब्रिगेड, ऑल इंडिया मजलिस ए – ईस्तेहादुल मुसलमीन, अवामी विकास पार्टी, श्रमजीवी संघटना ,मारवाडी युवा मंच, एकल महिला संघटना, वडार संघर्ष समिती, अखिल भारतीय सेना, जनाग्र संघटना, माहेश्वरी सभा, राष्ट्रवादी पार्टी, वकील संघ, खा.सुनील गायकवाड़ प्रतिष्ठान, वंदे मातरम प्रतिष्ठान उदगीर या संघटनांनी जाहिर पाठिंबा पत्रक दिले आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, तहशीलदार राजश्री मोरे यांनी गोंधळ जागरण आंदोलनाचे निवेदन स्वीकारले.

दिर्घकाळ वीजपुरवठा खंडित राहिल्याप्रकरणी वरिष्ठ अभियंता निलंबित तर 4 जणांना नोटीसेस