आयपीएल स्पर्धेत कमावलेली रक्कम कोरोना रुग्णांसाठी दान करा; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यादरम्यान आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द करण्यात आली आहे. यामुळे अनेक खेळाडू मायदेशी परतण्याच्या मार्गावर आहेत.

आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर या स्पर्धेतील कमावलेली रक्कम ही कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी द्यावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात वकील वंदना शाह यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत १००० कोटींच्या भरपाईची मागणी केली असुन या रकमेचा वापर कोरोनाच्या रुग्णांसाठी करण्यात यावा. तसेच आयपीएल स्पर्धेचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये येतो का? असा सवाल त्यानी केला आहे.

वंदना शाह यांनी याचिकेत ‘आयपीएल बोर्डाने कमावलेल्या नफ्यातून रुग्णालयांना देणगी द्यावी’ अशी मागणी केली आहे. आयपीएल स्पर्धा सुरु असताना अनेक स्तरातुन या स्पर्धेवर टिका होत होती. मंगळवारी स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय होण्याअगोदर सकाळी दिल्ली हायकोर्टात स्पर्धा रद्द करण्याची याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र याचिकेवर सुनावणी होण्याआधी स्पर्धा रद्द करण्याची घोषणा केली.

महत्वाच्या बातम्या