ट्रम्प यांचं राष्ट्रपती भवनात शाही स्वागत, 21 तोफांची सलामी

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. यात दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा होईल. दहशतवाद, सुरक्षा आणि व्यवहारासह अनेक मुद्दयांवर दोन्ही नेते बातचित करणार असल्याची माहिती मिळत आहे.

तसेच भारत आणि अमेरिकेदरम्यान अनेक करारांवरदेखील चर्चा करण्यात येणार आहे. तर ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यादेखील आज निरनिराळ्या ठिकाणांना भेट देणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज हैद्राबाद हाऊसमध्ये वेगवेगळ्या करारांवर चर्चा करणार. ट्रम्प कुटुंबियांसाठी राष्ट्रपती भवनात खास स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Loading...

याचप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांना आज भारतीय सैन्यदलाकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. तसेच, 21 तोफांची सलामी देत त्यांचं स्वागत करण्यात आलं. डोनाल्ड ट्रम्प यांचं सपत्नीक पारंपरिक पद्धतीनं राष्ट्रपती भवनात स्वागत करण्यात आलं. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नीने ट्रम्प दाम्पत्याचं राष्ट्रपती भवनात स्वागत केलं.

दरम्यान, या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते.ट्रम्प दाम्पत्यांचं राष्ट्रपती भवनात जंगी स्वागत झालं. त्यानंतर ते राजघाटकडे रवाना झाले. सोमवारी अहमदाबादमधील मोटेरा स्टेडिअममध्ये आयोजित करण्यात आलेल्या नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाची माहिती दिली होती. तीन अब्ज डॉलर्सच्या अत्याधुनिक लष्करी हेलिकॉप्टर आणि अन्य उपकरणांसाठी मंगळवारी करार करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश