डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय मोदींमुळे; या माजी मुख्यमंत्र्यांचा अजब दावा

donald trump & narendra modi

टीम महाराष्ट्र देशा: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच याचं नाव घेतल्यानेच ते विजयी झाल्याचा अजब दावा हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धूमल यांनी केला आहे. धूमल यांच्या या विधानामुळे सोशल मिडियावरून चांगलच टार्गेट केलं जात आहे.

Loading...

सध्या हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुक प्रचार शिगेला पोहचला असून भाजप विरुद्ध कॉंग्रेस असा थेट सामना रंगला आहे. चुराह येथे भाजप आमदार हंसराज यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभेत धूमल बोलत होते. अमेरिकेमध्ये सर्वाना हिलरी क्लिंटन विजयी होतील अस वाटल होत. मात्र ट्रम्प यांनी आपल्या प्रचारात नरेंद्र मोदी यांच नाव घेत मोदी हे भारताच्या विकासासाठी ज्याप्रमाणे काम करत आहेत, तसेच मीही अमेरिकेच्या विकासासाठी काम करेन असे त्यांनी सांगितले आणि त्यामुळे ते विजयी झाल्याचा दावा धूमल यांनी केला आहे.

 Loading…


Loading…

Loading...