एवढं दिल तरी पाकिस्तानने आम्हाला मुर्खात काढल; आता दमडीचीही मदत करणार नाही – ट्रम्प

donald trump on pakistan

टीम महाराष्ट्र देशा: ‘दहशतवाद्यां विरोधात लढण्यात पाकिस्तान मदत करेल म्हणून गेली १५ वर्षे झाले अमेरिका पाकिस्तानला मदत करते आहे. मागील १५ वर्षात आम्ही ३३ बिलियन डॉलरच्यावर मूर्खपणे त्यांना मदत केली. मात्र यापुढे एक दमडीची मदत केली जाणार नाही म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानवर निशाना साधला आहे. ट्रम्प यांनी ट्विट करत पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे.

आजवर अनेकवेळा अमेरिकेने पाकिस्तानला मदत केली. मात्र ज्या दहशतवाद्यांना आम्ही अफगाणिस्तानमध्ये शोधत होतो त्यांच्यासाठी पाकिस्तानने स्वत:ची भूमी नंदनवन करून ठेवल्याची फटकार देखील ट्रम्प यांनी लगावली आहे.

मागील अनेक वर्षापासून अमेरिका पाकिस्तानला आर्थिक मदत करते आहे. वेळोवेळी भारताकडून यावर आक्षेप घेण्यात आला आहे. अमेरिकेच्या मदतीने पाकिस्तान दहशतवाद रोखत नसून त्याला चालना देत असल्याचा दावा अनेक वेळा भारताकडून केला गेला. मात्र पाकिस्तान दहशवादाविरुद्ध लढण्यास अमेरिकेला मदत करेल या भावनेतून आपण मदत करंत असल्याचा दावा आजवरचे राज्यकर्ते करत आले आहेत. आता खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी खर चित्र जगासमोर आणत पाकिस्तानचा बुरखा फाडला आहे.

Loading...