डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष

वॉशिंगटन : डोनाल्ड ट्रम्प आज अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये आज ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा पार पडला. ही आपली नव्हे, तर जनतेची सत्ता असेल, असं ट्रम्प यांनी बोलताना सांगितलं.

 

या सोहळ्यासाठी मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा, माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश, बिल क्लिंटन, हिलेरी क्लिंटन यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती होती.

 

डोनाल्ड ट्रम्प गुरुवारी रात्रीच कुटुंबासह वॉशिंगटनमध्ये दाखल झाले होते. शपथविधीच्या पार्श्वभूमीवर देशभरात जल्लोष करण्यात आला. या शपथविधी सोहळ्यासाठी सुमारे आठ लाख लोक उपस्थित होते, असा दावा करण्यात आला आहे.

 

bagdure

शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वॉशिंगटनला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं होतं. महत्त्वाचं म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाच्या तब्बल 60 खासदारांनी शपथविधीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली होती.

 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला भारताकडून कोणताही नेता सहभागी झाला नव्हता. अमेरिकेतील भारताचे राजदूतच सोहळ्याला उपस्थित होते.

 

अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स ट्रम्प यांनी ट्रम्प यांना अध्यक्षपदाची शपथ दिली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आधी उपराष्ट्रपती माईक पेंस शपथ घेतली. यावेळी ट्रम्प देशाला संबोधित केलं. देशासाठी आपण समर्पित असल्याचं त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं.

You might also like
Comments
Loading...