डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मला पंतप्रधान नरेंद्र मोदी भरपूर आवडतात, पण…

नवी दिल्ली : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडतात. मात्र, भारतासोबत आताच व्यापारी करार करणार नाही”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. ते अमेरिकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नियोजित भारत दौऱ्याआधी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

व्यापारी संबंधांच्या विषयात भारताने अमेरिकेला चांगली वागणूक दिलेली नाही असे ट्रम्प म्हणाले आहेत. ‘माझी भारतासोबत मोठा व्यापारी करार करायची इच्छा आहे. आम्ही तो करार निश्चित करणारही आहोत. मला माहित नाही की, हा करार अमेरिकेच्या निवडणुकीअगोदर होईल का? मात्र, भविष्यात निश्चित करार करु,’ असे त्यांनी सांगितले.

Loading...

‘भारताकडून आम्हाला चांगली वागणूक मिळालेले नाही’ असे ट्रम्प अँड्रूयूज येथील तळावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. भारत दौऱ्यावर जाण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ‘मला पंतप्रधान नरेंद्र मोदी भरपूर आवडतात’ असे ट्रम्प यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. येत्या २४ फेब्रुवारीला ट्रम्प दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. “एअरपोर्टपासून रोड शो आणि स्टेडियमवरील कार्यक्रमात ७० लाख लोक सहभागी होणार असल्याचे त्यांनी मला सांगितले आहे. जगातील हे सर्वात मोठे स्टेडियम असल्याचे मला सांगण्यात आले आहे. त्यामुळे मी भरपूर उत्साहित आहे. तुम्हा सर्वांनाही आनंद मिळेल” असे ट्रम्प म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती