ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस; मोदींसोबतही द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले असून आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. सकाळी 10 वाजता डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांचं राष्ट्रपती भवनात पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात येईल. भारत-अमेरिकेच्या नात्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे.

तसेच डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज हैद्राबाद हाऊसमध्ये चर्चा करतील. त्यापूर्वी राष्ट्रपती भवनात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्या चर्चेनंतर अनेक करार होतील. तर अमेरिकेची फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प या आज नानकपुरा येथील एका सरकारी शाळेला भेट देतील.

Loading...

मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या भारतीय प्रतिनिधिमंडळात अमित शाह, राजनाथ सिंह, एस जयशंकर, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, जिंतेंद्र सिंह आणि हरगीप पूरी उपस्थित राहणार आहेत. यानंतर सकाळी 10.45 वाजता ट्रम्प आणि मेलानिया राष्ट्रपती भवनातून थेट राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादन करणार आहेत.

दरम्यान, हैद्राबाद हाऊसमधील बैठक संपल्यानंतर ट्रम्प दुपारी हॉटेल आयटीसी मौर्यला परततील. त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजता ते डिनरसाठी राष्ट्रपती भवनला पोहोचतील. त्यानंतर रात्री 9.30 च्या जवळपास ट्रम्प आणि त्यांचा संपूर्ण ताफा इंदिरा गांधी आतंरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती