‘भारतात येण्यास उत्सुक आहे, काही तासांतच सगळ्यांना भेटू’, मोदींच्या हिंदी ट्विटला ट्रम्प यांचे हिंदीतून उत्तर

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून (ता. २४) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या भारत दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले. अमेरिकेतील मेरिलँड राज्यातील लष्करी तळावरून डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्यासोबत येणारे कुटुंबीय व वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ तासाभरात अहमदाबादमध्ये दाखल होत आहेत. अमेरिकेच्या ‘एअर फोर्स वन’ हे खास विमान सोमवारी सकाळी 11.30 वाजता अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर पोहोचणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत तुमच्या येण्याची वाट पाहत आहे. तुमच्या भेटीमुळे दोन्ही देशातील मैत्री आणखी घट्ट होईल. अहमदाबादमध्ये लवकरच भेटू’ असं ट्विट मोदी यांनी केलं होतं. तर डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील मोदी यांच्या ट्विटला डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदीतून रीट्विट करत उत्तर दिलं आहे. ‘मोदी यांच्या या ट्विटला ट्रम्प यांनी हिंदीतून उत्तर दिलं आहे. ‘भारतात येण्यास उत्सुक आहे. सध्या वाटेत आहे. काही तासांतच सगळ्यांना भेटू.’ असं ट्विट ट्रम्प यांनी केलं आहे.

Loading...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दोन दिवसाच्या भारत भेटीत पहिल्या दिवशी २४ फेब्रुवारीला ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मोटेरा स्टेडियमवर ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात भाषण करतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच भारत भेटीत त्यांच्यासह त्यांच्या पत्नी मेलानिया याही येत आहेत. २४ आणि २५ फेब्रुवारी असे दोन दिवस ते भारतात असतील. यानिमित्त अहमदाबाद येथे अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. ट्रम्प हे विमानतळावरून निघाल्यानंतर ‘रोड शो’मध्ये त्यांचे रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोक स्वागत करणार आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश