बुमराह च्या ‘त्या’ नो बॉल मधून धडा घ्या

भारतात बेशिस्त वाहनचालकांची कमतरता नाही.सिग्नल तोडणे असू द्या किंवा हेल्मेट न घालता दुचाकी चालवणं  असू द्या  हे आणि यासारखे असंख्य वाहतुकीचे नियम मोडणारे प्रकार सर्रास पणे पहायला मिळतात .

अगदी सहज आपण वाहतुकीचे नियम पायदळी तुडवतो याच उदाहरण द्यायचं झालं तर  रेड सिग्नल असल्यास वाहन झेब्रा क्रॉसिंगच्या अलिकडेच ठेवा या साध्या नियमाचे पालन आपण करत नाही. म्हणूनच वाहतूक विभागाकडून रस्ते वाहतुकीचे नियम पाळले जावेत यासाठी तसेंच जनजागृती करण्यासाठी विविध शक्कली लढवल्या जातात .वाहनचकांमध्ये  रेड सिग्नल असल्यास वाहन झेब्रा क्रॉसिंगच्या अलिकडेच ठेवा या साध्या नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांसाठी   जयपूर वाहतूक पोलिसांनी एक ‘मिम’ शेअर केलाय. या ‘मिम’ची चर्चा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

रेड सिग्नल असल्यास वाहन झेब्रा क्रॉसिंगच्या अलिकडेच ठेवा. पादचाऱ्यांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष द्या’ अशी कॅप्शन लिहून जयपूर वाहतूक पोलिसांनी  ‘मिम’ शेअर केलाय. ज्यात एका बाजूला झेब्रा क्रॉसिंगच्या अलिकडेच गाड्या उभ्या आहेत तर दुसरीकडे वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहाचा बहुचर्चित नो बॉल दाखवण्यात आला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात बुमराहने लक्ष्मणरेखा ओलांडली ही त्याची  चूक भारतीय क्रिकेट संघाला चांगलीच महागात पडली. त्या नो बॉलमुळे पाकिस्तानचा फलंदाज झमन याला जीवदान मिळालं आणि पाकिस्थानच्या विजयात झमन ने  सिंहाचा वाटा  उचलला .बुमराहनं क्रिकेटच्या मैदानावर जशी चूक केली त्याच पद्धतीची चूक वाहन चालवताना आपण केली तर त्याची मोठी किंमत आपल्याला तसेच आपल्या परिवाराला मोजावी लागू शकते असा सूचक संदेश जयपूरच्या वाहतूक पोलिसांनी चालकांना दिलाय.

विनोदाचा भाग वगळता जयपूर पोलिसांनी लढवलेली शक्कल सर्वानाच अंतर्मुख करायला लावणारी आहे म्हणूनच चालकांना दिलेल्या संदेशाचे सध्या सोशल मीडियावर खूपच कौतुक होतंय!