पाईपद्वारे मिळणार देशातल्या ४०६ जिल्ह्यांमध्ये घरगुती गॅस

टीम महाराष्ट्र देशा- विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट नुकतीच करण्यात आली आहे. आता पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने देशातल्या चारशे सहा जिल्हयांमध्ये घरगुती वापराचा गॅस पुरवठा पाईपद्वारे करण्यासाठी परवानगी दिली आहे.

पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी काल राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. परवानगी मिळालेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, आणि अहमदनगर सह एकोणीस जिल्ह्यांचा समावेश आहे.