मुंबई : राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी या घडतच असतात. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची खेळी सुरूच असते. तसेच कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या घरातून राज्य कारभाराची सूत्रे हलवली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांवर विरोधकांनी चांगलाच हल्लाबोल केला होता. परंतू काल जवळजवळ दोन वर्षानंतर 13 एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रायलयात गेले होते.
मुख्यमंत्री तब्बल दोन वर्षांनंतर मंत्रायलात गेल्या असल्यामुळे राज्यातील अनेक विरोधी पक्षनेत्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. अशातच याच मुद्यावरून रयत क्रांती संस्थेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही एक वक्तव्य केलं आहे. “घरगुती मुख्यमंत्री अखेर काल मंत्रालयात दाखल”, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी उद्धव ठाकरेंना चांगलंच फटकारल आहे.
सदाभाऊ खोत यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवर या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये ते “दीड वर्षांनी गर्जतो महाराष्ट्र माझा. संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटावा असा दिवस आलाच.” असंही म्हणाले असल्याचं पाहायला मिळतं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या मंत्रालयात दाखल होण्यावरून राज्याती काही पक्षनेत्यांनीही त्यांच्यावर निशाणा साधले होते. त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांचाही समावेश आहे. संदीप देशपांडे यांना पत्रकारांकडून दोन वर्षांनी राज्याचे मुख्यमंत्री मंत्रालयात जात आहेत, यावर विचारण्यात आले. त्यावर “पेढे वाटुया” असं त्यांनी म्हटलं होतं. तसेच “राज्याचे मुख्यमंत्री दोन वर्षांनी मंत्रालयात जातात ही महाराष्ट्रालाचा लाज वाटली पाहिजे”, असंही ते म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :