डोंबिवली माझ्या पाहणीतलं सगळ्यात घाणेरड शहर – नितीन गडकरी

टीम महाराष्ट्र देशा : माझ्या पाहणीतलं सगळ्यात घाणेरड्या शहरांपैकी एक शहर हे डोंबिवली आहे असं वक्तव्य केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. डोंबिवलीतील फडके रोडवरील गणपती मंदिरातर्फे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा वेबिनार आयोजित करण्यात आला होता. या वेबिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी थेट मंत्रीमहोदयासोबत संवाद साधला.

यावेळी एका विद्यार्थिनीनं गडकरींना प्रश्न विचारला की डोंबिवली मुंबईच्या इतकं जवळ असूनही डोंबिवलीकरांना मुंबईइतक्या सोयीसुविधा का मिळत नाही त्यावर गडकरींनी उत्तर दिलं की, "माझ्या पाहणीतलं सगळ्यात घाणेरड्या शहरांपैकी एक शहर डोंबिवली आहे." विशेष म्हणजे, गेली 20 वर्षं शिवसेना-भाजपची सत्ता आहे आणि भाजपचेच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आहेत.

You might also like
Comments
Loading...