पिंपरी चिंचवड शहरात मोकाट जनावरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करा ; आयुक्तांना निवेदन.

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरीक हैराण झाले आहेत. जनावरांचे मालक जनावरांना मोकळे सोडून देतात हे जनावरे रस्तावर बसतात किंवा रस्त्याच्या कडेला असलेल्या कचराकुंडीवर चरतात यामुळे ट्राफीक जाम होते. तसेच पादचारी, शाळकरी मुले , जेष्ठ नागरीक यांच्या आंगावर धावून जाण्याने आनेक आपघात झाले आहेत. कचराकुंड्यावर भटके कुत्रे त्याच ठिकाणी असल्याने अनेक नाकरीकांना व लहान मुलांना चावल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या वतीने त्वरीत कारवाई करावी. जनावरे मोकाट सोडणा-या मालकावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व भटक्या कुंत्र्यांचा योग्य बंदोबस्त करुन त्यांचे गनना करुन लसीकरण करण्यात यावे असे निवेदन मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी महानगरपालीका आयुक्तांना देवून मागणी केली आहे. यावेळी संस्थेचे शहर उपाध्यक्ष विकास शाहाने , अँड. सचिन काळे , मुरलीधर दळवी , आधी पदाधिकारी उपस्थित होते.