आज सकाळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार होते. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या घराबाहेर गर्दी करत घोषणाबाजी केली. त्यानंतर राणा दाम्पत्याने मातोश्रीवर जाणार नसल्याचं जाहीर केलं. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला होता.
त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना संजय राऊतांना त्यांचा पक्षही गांभीर्याने घेत नाही, असा टोला लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :