उद्धव ठाकरेंना आरक्षणातील काही कळतं का? : राणे

मी अभ्यास करुन अहवाल सादर केला. या आधारे आघाडी सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले,

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणावर भाष्य करताना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. उद्धव ठाकरेंना आरक्षणातील काय कळतं, घटनेतील कोणत्या कलमांतर्गत आणि कसे आरक्षण देता येईल हे त्यांनी सांगावे, अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. रत्नागिरीतील स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा बुधवारी चिपळूण येथील माटे सभाागृहात पार पडला. यात खा. नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

नेमकं काय म्हणाले नारायण राणे ?

bagdure

मराठा आरक्षणासंदर्भात नारायण राणे म्हणाले, मी मंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. राज्यात ३४ टक्के मराठा समाज असून यातील २० टक्के समाज दारिद्य्रात आहे. अशा लोकांसाठी मी अभ्यास करुन अहवाल सादर केला. या आधारे आघाडी सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले. पण राज्यात सत्तेवर येताच शिवसेनेने हे आरक्षण काढून घेतले. शिवसेनेमध्ये आज अनेक मराठा आमदार, खासदार आहेत. पण ते फक्त पदाला चिकटले आणि जात विसरले. उद्धव ठाकरेंना आरक्षणातील काही कळतं का, घटनेतील कोणत्या कलमाअंतर्गत आरक्षण मिळते हे त्यांनी सांगावे.

मराठा आरक्षण : कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण आम्हीच देणार

You might also like
Comments
Loading...