‘ठाकरे सरकारमध्ये बार मालकांना धाक आहे का संरक्षण?’

uddhav

ठाणे : महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी निर्बंध कायम करण्यात आले आहेत. या व्यावसायिकांना दुपारी चार वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. राज्यात उद्योगधंदे, दुकाने, मंदिर बंद असताना सामान्य जनतेवर निर्बंध तर ठाण्यात मात्र सर्रास डान्सबार सुरू आहेत. आता या डान्स बार मालकांवर कोणाची मेहेरनजर आहे का असा सवाल उपस्थित होतोय.

यावरून आता महाविकास आघाडी सरकारवर भाजपचे आ.निरंजन डावखरे यांनी हल्ला चढवला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये बार मालकांना धाक आहे का संरक्षण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शांत, सुसंस्कृत आणि सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या ठाण्याची सामाजिक सुरक्षितता धोक्यात आलीयं. महाविकास आघाडी सरकारमध्ये ठाण्याचे दोन मंत्री असूनही, बिनधास्तपणे लेडीज बार सुरू, लेडीज बारमालकांना धाक नव्हे संरक्षण आहे का? अशा शब्दात त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली आहे.

तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे. ‘महाराष्ट्राचे नविन मॅाडेल..‘उद्योग धंद्यांना बंदी, डान्स बारची चांदी’ करायचा असेल व्यवसाय तर द्यावा लागेल हफ्ता, नाहीतर कोविडचे नियम पाळा अन दुकानाचे शटर पाडा.. सामान्य व्यापारी कोमात, वसूली सरकार जोमात’ या शब्दांत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP