राज्यात सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? : हायकोर्ट

मुंबई – दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्यांच्या तपासाची सुनावणी आज मुंबई हायकोर्टात सुरू होती. त्यादरम्यान, न्यायमूर्तींनी हे मत नोंदवले. राज्यातील सध्याचे चित्र विदारक आहे. दगडफेक, जाळपोळीच्या घटनांमुळे परिस्थिती स्फोटक बनली आहे. सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे, राज्यात सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? अशी टिप्पणी मुंबई हायकोर्टाने केली आहे.

आरक्षणासाठी मराठा समाजाने राज्यात सुरू केलेल्या तीव्र आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण प्राप्त होत आहे. सार्वजनिक मालमत्तेची, खाजगी वाहनांची जाळपोळ होत आहे. काही ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने राज्यातील सध्याची परिस्थिती विदारक बनली असल्याचे सांगत मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान होत असलेल्या हिंसाचाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपात घुसमट होतीये – एकनाथ खडसे

दिल्लीत दोन आमदारांच्या मुलांचे सरकारी शाळेत प्रवेश!