बुलढाणा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढवावी आणि माझ्या विरोधात जिंकून दाखवावे असे खुले आव्हान खासदार नवनीत राणा यांनी दिले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना बुलडाण्यातील शिवसेनेचे आमदार नवनीत राणा यांच्यावर चांगलेच भडकले आहेत.
नवनीत राणा यांनी आधी आपली जात ठिकाणावर ठेवावी आणि नंतर निवडणूक लढवावी असा टोला संजय गायकवाड यांनी लगावलाय. आपल्या पक्षातील 100 आमदार निवडून आणू शकतात, सरकार चालवतात त्यांच्या बाबतीत बोलण्याची राणा यांची औकात तरी आहे का? उद्धव ठाकरे तर सोडाच एखाद्या फाटक्या शिवसैनिकांच्या विरोधात निवडणूक लढवून निवडून येऊन दाखवा असे आव्हान देखील आमदार गायकवाड यांनी नवनीत राणा यांना दिले आहे.
महत्वाच्या बातम्या –