भाजपचा आधी राजीनामा आता अपक्षाला पाठिंबा का? – महापौर नंदकुमार घोडेले

bjp flag

औरंगाबाद : महापालिका निवडणूक तोंडावर असताना भाजपने पाणीपुरवठा योजनेच्या स्थगितीचे राजकारण करून राजीनामा देत उपमहापौरपदाची निवडणूक लादली. आधी राजीनामा दिला मग आता भाजप अपक्षाला पाठिंबा का देत आहे.

फक्त उपमहापौरांनीच राजीनामा का दिला? इतर पदाधिकारी राजीनामा कधी देणार? असा सवाल करत महापौर नंदकुमार घोडेले यांनी पुन्हा एकदा भाजपला टार्गेट केले.

पत्रकारांसोबत बोलताना घोडेले पुढे म्हणाले, महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्यामुळे सर्वच नगरसेवक कामात मग्न होते; मात्र भाजपने स्टंटबाजी करत राजीनामा दिला. आधी सत्तेतून बाहेर पडायचे, नंतर त्यांच्याच गटातील रिपाइंच्या (डेमॉक्रॅटिक) नगरसेवकाला पाठिंबा कशाला द्यायचा असा प्रश्न घोडेले यांनी केला.

नव्या राजकीय समिकरणानुसार अद्याप निर्णय झालेला नाही. 31 तारखेला निवडणूक आहे. तोपर्यंत काहीही घडू शकते, असे घोडले यांनी नमूद केले.