‘गुजरातसारखं महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची का?’

‘गुजरातसारखं महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची का?’

Nana Patole

नागपूर: राज्यात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. एसटी कामगारांचे आंदोलन आणि त्यातच अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार, यामुळे राजकारण चांगलेच तापत आहे. महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात याच मुद्यांवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमरावती हिंसचारासाठी दोषी ठरवले आहे तर दुसरी कडे भाजप हिंसाचार झाला म्हणून आता आंदोलने करत आहेत.

एकंदरीतच राज्याची राजकीय स्थिती अत्यंत वाईट असल्याचे चित्र दिसत आहे. कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी याच मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप नेत्यांचे सत्ता गेल्यापासून वागणे विरोधी पक्षासारखे नाही तर महाराष्ट्र विरोधी पक्षासारखे असल्याचे टीका कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. राज्यातील नांदेड, मालेगाव आणि अमरावती शहरात झालेले प्रकार चिंतेचा विषय असून राज्य सरकारने वेळीच परिस्थिती आटोक्यात आणली आहे, असंही नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

भाजपवर टीका करताना कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, भाजपला गुजरात प्रमाणेच महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. अमरावती शहरातील परिस्थिती शांत झालेली असताना भाजपकडून जाणीवपूर्वक चिथावणी दिली जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. भाजप राजकीय स्वार्थासाठी दंगली भडकावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका देखील नाना पटोले यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या: