अमृता फडणवीस यांना ‘महाराष्ट्र भाजप’ टेकओव्हर करायची आहे का ? : किशोर तिवारी

टीम महाराष्ट्र देशा – राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या अमृता फडणवीस यांना आवरा असं पत्र शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांना लिहिलं आहे. अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. आदित्य ठाकरे यांचा जो उल्लेख अमृता फडणवीस यांनी केला होता. त्याचा निषेध करत किशोर तिवारी यांनी हे पत्र लिहिलं आहे.यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही आवरावं अशी विनंती केली आहे. त्यामुळे संघ आता काय भूमिका घेतंय हे बघणं महत्वाचं आहे.

काल ट्विटरवरून अमृता फडणवीस यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तसेच राज्यातील भाजप आणि शिवसेना यांचा काडीमोड होऊन महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून त्या शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि पक्षावर टीका करत आहेत.

Loading...

त्यामुळे दोन्ही पक्ष आणखीनच दुरावले आहेत असंही तिवारी म्हणाले आहेत. तसेच माता सीतेनंही रावणावर टीका केल्याचं ऐकिवात नाही , जे करायचं ते भगवान श्री राम आणि हनुमान यांनी केलं होता. अशा शब्दांत तिवारींनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

तसेच अमृता फडणवीस यांना महाराष्ट्र भाजप टेकओव्हर करायचा आहे का ? असा सवाल भाजपमधीलच काही लोकं विचारात असल्याचा दावाही तिवारींनी केला आहे. तसेच २०२४ मध्ये अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यांमुळे भाजपच नुकसान होऊ नये असं आपल्याला वाटत असंही तिवारी म्हणाले आहेत.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका