‘अंजलीबाई’ने गुपचूप केला साखरपुडा ?

akshara deodhar and suyash tilak

टीम महाराष्ट्र देशा : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठी मालिकेतील अंजलीबाई अर्थातच अभिनेत्री अक्षया देवधर व ‘का रे दुरावा’ फेम अभिनेता सुयश टिळक यांनी गुपचूप साखरपुडा केल्याचे वृत्त आहे. अंजलीबाईला त्यांच्या आयुष्यातील खरा ‘राणा’ मिळाला आहे.

Loading...

Akshaya Deodhar and Suyash Tilakदोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यांनी नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोवरून त्यांचे अफेयर असल्याची चर्चा सुरू होती. सुयशने दोघांचा सोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात अक्षयाच्या हातात हिऱ्याची अंगठी दिसत आहे. त्या फोटोसोबत सुयशने लिहिले की, ‘सर्वत्र प्रेम, सकारात्मकता आणि आनंद पसरवा’.

त्याच्या या पोस्टमुळे दोघांनी गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र या केवळ अफवा असल्याचे त्यांच्या काही निकटवर्तीयांकडून कळते.

View this post on Instagram

Best of 2017 ! ❤️😘 @suyashtlk

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr) on

परंतु दोघे एकमेकांसोबतचे फोटो नेहमी सोशल मिडियावर शेअर करत असतात. यापूर्वी त्यांनी लग्न केल्याचेदेखील बोलले जात होते.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...