पश्चिम बंगालमधील आरोग्यव्यवस्था कोलमडली, ७०० डॉक्टरांनी दिले सामुहिक राजीनामे

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या दिल्ली मेडिकल असोसिएशन (DMA) आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. १७ जून रोजी होणाऱ्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्याची घोषणा या संघटनेने केली आहे. या संपाला पाठिंबा देत एम्ससह दिल्लीतील १८ हॉस्पिटलमधील १० हजारांहून अधिक डॉक्टर आज संपावर जाणार आहेत.

कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टरशुक्रवारी (14 जून) संपावर होते. डॉक्टरला मारहाण केल्यानंतर सुरू झालेल्या डॉक्टरांचे कामबंद आंदोलन आता देशभर पसरले असून, महाराष्ट्र, बिहार, नवी दिल्ली, गोवा, झारखंडसह अनेक राज्यांतील डॉक्टर त्यात सहभागी झाले आहेत.

आंदोलनाचा भाग म्हणून देशभरातील डॉक्टर सोमवारी कामबंद आंदोलन करणार आहेत. आंदोलनामुळे देशातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ 700 डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे.Loading…
Loading...