कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा

मुंबई : बॉलिवूड गायिका कनिका कपूरच्या अडचणीत वाढ झाली आहे. कनिकाचा कोरोनाचा चौथा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. कनिका कपूर काही दिवसांपूर्वीच लंडन मधून भारतात आली होती. त्यानंतर तिने अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. मात्र कनिकाला काही दिवसांनी करोनाच्या संसर्गाचा त्रास होण्यास सुरवात झाली. त्यानंतर तिला कोरोना झाला असल्याचं समोर आलं.

कनिका कपूरने आपल्या इंस्टा अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली. तसेच तिने ‘वेळ’ असा एक वॉलपेपर टाकत त्याखाली एक मेसेज लिहिला आहे. तिने लिहिले आहे की, मी विश्रांती घेत आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा मझ्या सोबत आहेतच. तुम्ही पण सुरक्षित राहा. काळजी घ्या. मी ठीक आहे. ICUमध्ये वगैरे नाही. मला आशा आहे पुढचा अहवाल हा नकारात्मक असेल. मी माझा कुटुंबियांना खूप मिस करत आहे.

कनिका कपूर सध्या लखनऊच्या संजय गांधी पोस्टग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये कोरोना व्हायरसवर उपचार घेत आहे. या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर आर. के. धीमान यांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार कनिका गंभीर आजारी असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत. तिची प्रकृती सध्या स्थीर असून ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. तसेच खाण्यापिण्याच्या वेळाही ती काटेकोरपणे पाळत आहे.

डॉ. आर. के. धीमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिकामध्ये आता कोरोनाची कोणतीही लक्षण दिसत नाही आहे. पूर्वीपेक्षा आता तिच्या तब्येतीत झपाट्यानं सुधारणा होत आहे. आता ती पूर्वीप्रमाणेच सामान्य व्यक्तीसारखं जेवण घेत आहे. ती खूप आजारी आहे अशा चर्चा सुरू आहेत मात्र या केवळ अफवा आहेत. तिच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. चिंतेचं कोणतही कारण नाही.

दरम्यान कनिका कपूरला कोरनाची लागण झाल्यामुळे संपूर्ण देशात आणि बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. कनिकाच्या पॉझिटिव्ह अहवालानंतर तिच्या संपर्कात आलेल्या अनेक दिग्गज नेत्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले होते. विशेष म्हणजे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही स्वत:ची टेस्ट केली. पण त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले.