सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी बहाल

मुंबई  : इंस्टिट्युट ऑफ चार्टर्ड फायनान्शियल ॲनॅलिस्ट ऑफ इंडिया, सिक्किम विद्यापीठाने सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स (Honoris Causa) ही सन्माननीय पदवी देऊन त्यांचा गौरव केला.

इकफाई युनिर्व्हसिटीचा पदवीदान समारंभ चिंतन भवन, गंगटोक येथे आज पार पडला. त्यावेळी सिक्किम राज्याचे मुख्यमंत्री पवन चामलिंग, मानव संसाधन विकास मंत्री आर.बी. सुब्बा, मुख्यसचिव ए.के. श्रीवास्तव, इकफाई विद्यापीठाच्या अध्यक्षा शोभाराणी, कुलगुरू प्रो. राम पाल कौशिक, उपकुलगुरू डॉ. जगन्नाथ पटनाईक, रजनीदेवी पाटील उपस्थित होते.

Rohan Deshmukh

सन्माननीय पदवी स्वीकारल्यानंतर श्रीनिवास पाटील यांनी हा सन्मान सिक्किमवासियांना समर्पित केला. माझे कुटुंबिय आणि हितचिंतक असलेल्या सिक्किमवासियांच्या प्रेमापोटी मला हा सन्मान स्वीकारताना मनस्वी आनंद होत असून, ही माझ्यासाठी अभिमानस्पद बाब असल्याच्या भावना त्यांनी या सोहळ्यात व्यक्त केल्या.

ग्रामीण भागात जन्मलेल्या श्री.पाटील यांनी शैक्षणिक जीवनात योग्य वाटचाल करीत सनदी अधिकारी म्हणून उच्च पदावर महाराष्ट्र व अनेक राज्यात विविध पदावर काम केले आहे. राजकीय जीवनात खासदार म्हणून महाराष्ट्रातून दोनवेळा लोकसभेवर निवडून त्यांनी जनतेची सेवा केली आहे. यानंतर सिक्किमचे राज्यपाल म्हणून गेली पाच वर्षे तेथील जनतेशी एकरूप होऊन राज्याच्या जैविक शेतीला प्रोत्साहन दिले. तेथील क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि शैक्षणिक प्रगतीसाठी मोलाचे कार्य केले आहे. इकफाई युनिर्व्हसिटीने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी विद्यापीठाच्या अध्यक्षा शोभाराणी यांच्याहस्ते त्यांना प्रदान केली.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...