साध्वी आणि ब्राह्मण समाजाविरोधात फेसबुकवर पोस्ट टाकल्याप्रकरणी डॉक्टरला अटक

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि गलिच्छ फेसबुक पोस्ट टाकल्याप्रकरणी एका डॉक्टरला विक्रोळीतून अटक करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तिवारी यांनी विक्रोळी येथील पार्कसाइट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी डॉक्टर निषाद यांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील कुमार निषाद असे या डॉक्टराचे नाव आहे. हिंदू आणि ब्राह्मण समाजाविरोधात ते अनेकदा फेसबुकवर लिखाण करतात. यावेळी त्यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी असलेली पोस्ट फेसबुकवर शेअर केली. डॉक्टर निषाद हिंदू समाज आणि विशेष करून ब्राह्मण समाजाविरोधात अनेकदा फेसबुकवर लिहीत होते असं समोर आलं आहे.