‘पेल्यातलं वादळ पेल्यातच शमणार,’ धनंजय मुंडेंचा टोला

dhanajay munde pankaja munde

टीम महाराष्ट्र देशा : गुरुवारी गोपीनाथ गड या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचं औचित्य साधत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. १ डिसेंबर रोजी पंकजा मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तसेच १२ डिसेंबरला पंकजा मुंडे काय बोलणार पुढची राजकीय भूमिका काय ठरवणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष्य लागले होते.

गोपीनाथ गडावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘मी आता महाराष्ट्रासाठी काम करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. एवढंच नाही तर मला कोअर कमिटीतूनही रजा द्या,’ असे मुंडे म्हणाल्या. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा आणि चांगला सधन शेतकरी तयार करण्यासाठी योगदान द्या, असं आवाहनचं त्यांनी केले.

तसेच या सगळ्या शक्तीप्रदर्शनावर धनंजय मुंडे यांनी टोला लगावला आहे. “माझ्या विरोधात असलेल्या नेत्याला रसद देण्यात आली असं पंकजा मुंडे म्हणाल्या. या त्यांच्या वक्तव्यावरुन आम्ही ताकदवान होतो हे तरी किमान त्या मान्य करतात. आमच्या हाती सत्ता नव्हती तरीही आम्ही सामर्थ्यशाली राहिलो”

दरम्यान, एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे. ” “पेल्यातलं वादळ पेल्यातच शमणार” असं म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेना टोला लगावला. तसेच एवढंच नाही तर पाच वर्षे सत्ता असूनही भाजपा सरकार गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक उभारु शकलं नाही यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय? असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थितीत केला.

महत्वाच्या बातम्या