‘उरलेली जनावरे तुमच्या घरी आणून सोडायची का?’

टीम महारष्ट्र देश – महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. सरकारने आता कुठे जनावरांच्या चारा छावण्यांसाठी अर्ज मागवायला सुरुवात केली आहे. सरकार फक्त पाच जनावरांना चारा देणार आहे. मुख्यमंत्री साहेब, एखाद्याकडे १५ जनावरे असतील तर उरलेली १० तुमच्या घरी आणून सोडायची का?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारल आहे.

अकलूज येथील राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेत ते बोलत होते.

यावेळी मुंडे म्हणले, छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी तिजोरी खुली केली होती परंतु आजचे हे सरकार शेतकरी मेला तरी चालेल अशा भूमिकेत आहे.

इमानदार चौकीदार आज देशाच्या चौकीदारामुळे बदनाम होत असेल तर यासारखे देशाचे दुर्दैव नाही असा टोला यावेळी मुंडेंनी लगावला आहे.