मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. फक्त इतकेच नाही तर मलिक यांच्या सुटकेसाठी निदर्शनेही काढण्यात येत आहेत. तर दुसरीकडे नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच राज्यात आडनावावरून न्यायिक भूमिका ठरतात का?, असा सवालही शेलारांनी केला आहे.
यावेळी बोलत असतांना आशिष शेलार म्हणाले की,‘संजय राठोडांवर आरोप झाला, त्यांचा लगेच राजीनामा घेण्यात आला. परंतु नवाब मलिकांवर अतीभयंकर आरोप झाला तरी त्यांचा राजीनामा न घेता समर्थन होत आहे. संजय राठोड आणि नवाब मलिक यांच्यातली न्यायिक भूमिका कोणती?’, असे शेलार म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘संभाजीराजेंकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. परंतु नवाब मलिकांच्या रुदालीत सामील व्हायला सगळे मंत्रिमंडळ लगेच दाखल होतं. या सरकारची प्राथमिकता कशाला आहे? या राज्यात आडनावावर न्यायिक भूमिका ठरतात का?’, असा सवालही शेलारांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- …तर मुख्यमंत्र्यांना शंभर टक्के पाठिंबा देऊ- आशिष शेलार
- “मुख्यमंत्री ठाकरे तुम्ही पवारांच्या समोर झुकू नका”, शेलारांचा सल्ला
- “संभाजीराजेंना आपला विजय झाला हा समज असेल तर..”, चंद्रकांत पाटलांचा टोला
- ‘वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा चित्रपटसारखी संजय राऊतांची अवस्था’ – आशिष शेलार
- दीपा कर्माकर धक्कादायक रित्या कारण न सांगताच FID कडून सस्पेंड
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<