पारनेरच्या लोकप्रतिनिधींना तालुक्यातील गावांची नावे तरी माहिती आहेत का? – डॉ.सुजय विखे

अहमदनगर – या भागातील लोकप्रतिनिधींना वर्षानुवर्षे तुम्ही निवडून देता. पण त्यांनी एकही प्रश्न सोडविलेला नाही. प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी नियोजन केले नाही. या भागातील गावांची नावे देखील या लोकप्रतिनिधींना माहिती आहे की नाही असा प्रश्न पडतो, अशी टीका डॉ. सुजय विखे-पाटील यांनी आमदार विजय औंटींचे नाव न घेता केली.डॉ. सुजय विखे-पाटील यांनी तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

राजकारणापेक्षा विखे पाटील परिवाराने समाजकारणाला प्राधान्य दिले आहे. खोटे बोलून आम्ही कधीही लोकांशी-दिशाभूल केली नाही. दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ केवळ लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे आली असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.

कॉंग्रेसला धक्का,अल्पसंख्यांक विभागाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षांचा राजीनामा,राष्ट्रवादीत करणार प्रवेश

युतीचे उमेदवार २०० जागांवर विजयी होतील; चंद्रकांत पाटलांना आत्मविश्वास