शहीद जवानाची मुलगी म्हणते मला डॉक्टर व्हायचंय, प्रियांका म्हणतात ‘काळजी नसावी… मी तूला डॉक्टर करेन’

blank

नवी दिल्ली- पुलवामा दहशतवादी हल्ल्यात उन्नाव येथील जवान अजित कुमार हे शहीद झाले आहेत. शहीद जवानाच्या मुलीने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींना फोन केला आणि मला डॉक्टर व्हायचंय, अशी इच्छा बोलून दाखवली. त्यावर प्रियंका म्हणाल्या की, काळजी नसावी… मी तूला डॉक्टर करेन, असे मदतीचं वचन त्यांनी त्या मुलीला दिले.

शहीद जवान अजित कुमार यांची मुलगी ईशा हिच्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नात माझाही नक्की वाटा असेल असे म्हणत प्रियांकांनी ईशाला मदतीचं आश्वासन दिलं आहे.

उन्नावमधी काँग्रेसच्या माजी खासदार अन्नू टंडन यांनी ईशाचा संपर्क प्रियांकांशी घडवून आणला आणि मग ईशाचं आणि प्रियांकांचं बोलणं होऊ शकलं.

राजकीय नेते आपल्या राजकीय जीवनात खूप व्यस्त असतात. ते अनेक प्रकारची आश्वासने नेहमी देत असतात आणि दिलेली आश्वासने सपशेल विसरत असतात, मात्र प्रियांका गांधी याला अपवाद ठरणार का? हेच पाहायचंय.