सत्तार पक्षात नको, भाजपा स्थानिक पदाधिकारी दानवेंच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसचे सिल्लोडमधील आमदार अब्दुल सत्तार यांना पक्षात घेण्यास भाजपमधून तीव्र विरोध होत आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे आमदार अब्दुल सत्तार यांच्या भाजपप्रवेशाच्या अडचणीत वाढल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ पातळीवरुन अब्दुल सत्तार यांच्या पक्षप्रवेशाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.

दरम्यान, सहा जून रोजी आपल्या भाजप प्रवेशाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितलं होतं. मात्र, ६ जून संपला, तरी भाजप प्रवेशाबाबत निर्णय झालेला नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे अब्दुल सत्तार यांचा भाजप प्रवेश होणार का ? ह्याकडे सिल्लोडकरांचे लक्ष लागले आहे.
नुकतीच सिल्लोडच्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांना पक्षात घेऊ नका अशी विनंती केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Loading...

अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला विरोध करण्यासाठी 4 जूनला सिल्लोड येथे बैठकही आयोजित करण्यात आली होती. भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे आणि माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांनी सत्तरांच्या भाजप प्रवेशाला कडाडून विरोध केला आहे. त्याचबरोबर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांना पक्षात घेण्याबाबत नाराजी दर्शवली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात