पवारांना मराठा आरक्षण नको आहे का ? – नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा : आरक्षणाबाबतचा प्रश्न शरद पवारांनी आताच का उपस्थित केला, याचा विचार व्हायला हवा. याआधी शरद पवारांनी आर्थिक निकषाचा कधीच उल्लेख केला नाही. त्यामुळे आरक्षणाबाबत आताच का चर्चा होतेय ? आता जे आरक्षण लागू आहे त्या समाजाची आर्थिक परिस्थिती बघूनच ते देण्यात आलं आहे. मराठा समाजाला आरक्षण हे शैक्षणिक, आर्थिक निकषाच्या आधारावरच मागतोय. पवारांना मराठा आरक्षण नको आहे का हे त्यांनी सांगाव असा टोला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शरद पवारांना लगावला आहे.

सध्या चर्चा आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीची. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दा गाजत असतानाच आता नारायण राणे यांनीही पवार यांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर भाष्य केलं आहे.

You might also like
Comments
Loading...